तुम्ही मर्द आहात ना? मग डायरेक्ट देवेंद्रजींना टार्गेट करा; अमृता फडणवीसांचं प्रत्युत्तर

0
538

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजप आणि ड्रग्जचा व्यवसाय करणाऱ्यांचे संबंध असल्याचा आरोप करत थेट विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांचा एक फोटो ट्विट केला होता. यावरुन अमृता फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत नवाब मलिकांना प्रत्युत्तर दिलं आहे.

हे ही वाचा : उद्धव ठाकरे, शरद पवार आणि अजित पवार येणार एकाच मंचावर; चर्चांना उधान

देवेंद्रजींना टार्गेट करायला तेच आज माझ्याबाबतीत केलं गेलं. तुम्ही मर्द आहात ना? डायरेक्ट त्यांना टार्गेट करा. मला मध्ये नका आणू. एक समाज सेविका म्हणून मी माझे विचार प्रकट करत असते आणि करत राहील. मला कोणीही थांबवू शकत नाही, असं अमृता म्हणाल्या आहेत.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस ड्रग्ज पेडलरच्या पाठीशी असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी त्यांच्या जावयाला विचारावं कोण कुणाच्या पाठिशी आहे. बेनकाब नवाब भी होता है और वो जरुर होगा. फक्त वेळ यावी लागते, असं सूचक विधान त्यांनी केलं. मी ट्विट केलं. काही लोकांना काहीच सूचत नाही, त्याबद्दल मी ट्विट केलं आहे. जेव्हा एखाद्या माणसात निगेटिव्हीटी आलेली असती तेव्हा तो खराबच विचार करतो. बाकी काही नाही, असंही अमृता फडणवीसांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी – 

 नवाब मलिकांचे देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप; पंकजा मुंडे म्हणल्या…

“..म्हणून मी ईडीच्या चौकशीला सामोरे जातोय”

येत्या दोन वर्षांत शिवसेनेतील अनेक जण आमच्याकडे येतील; नारायण राणेंचा दावा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here