आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : एसटी संपावर तोडगा काढण्यासाठी परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज थेट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी फडणवीसांसोबत एसटी कामगारांच्या संपावर चर्चा केली.
हे ही वाचा : कंगणा हलकट बाई, तिनं सत्ताधाऱ्यांचे पाय चाटून पद्मश्री घेतलाय; शिवसेनेचा हल्लाबोल
कोर्टाचे आदेश आणि एसटीची आर्थिक स्थिती यावरही या बैठकीत चर्चा झाली. यावेळी अनिल परब यांनी चर्चेच्या तोडग्याचा फॉर्म्युला देण्याचं ठरल्याचं सांगितलं जातंय. तसेच पगाराचा मुद्दा कसा सोडवायचा याबाबतच्याही काही सूचना फडणवीस यांनी परब यांना दिल्या असून ही बैठक सकारात्मक झाल्याचं समजतंय.
दरम्यान, या भेटीनंतर परबांनी माध्यमांशी संवाद साधला. एसटी कर्मचाऱ्यांशी आजही चर्चा करण्यासाठी आम्ही तयार आहोत. फडणवीसांनीही या अनुषंगाने काही सूचना केल्या आहेत. त्या सूचनांचा आम्ही जरूर विचार करू. चर्चा सकारात्मक करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असं परब म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
“राष्ट्रवादीत जोरदार इनकमिंग; मावळमधील भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश”
“नाना पटोले यांच्या पाठोपाठ आता बाळासाहेब थोरातही फडणवीसांच्या भेटीला; राजकीय हालचालींना वेग”
शरद पवारांचं दिल्लीत कोणीपण नाव घेत नाही; नारायण राणेंचा टोला