आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीनं आपली कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच आता मावळमध्ये राष्ट्रवादीनं भाजपला मोठा धक्का दिला आहे.
हे ही वाचा : “नाना पटोले यांच्या पाठोपाठ आता बाळासाहेब थोरातही फडणवीसांच्या भेटीला; राजकीय हालचालींना वेग”
मावळमधील भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पाडला. तसेच या पक्षप्रवेश सोहळ्यात मावळ मतदारसंघातील अनेक कार्यकर्ते तसेच माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती धरला.
दरम्यान, यावेळी जयंत पाटलांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. मावळ भागात विकास कामे जोराने सुरू आहेत. सर्वांनी तरुण नेतृत्व स्वीकारले आहे. यात आपण सर्व गट-तट सोडून एकत्र आला आहात. मावळ तालुक्याला काहीही कमी पडणार नाही याची जबाबदारी पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी घेतली आहे. तेंव्हा मावळच्या विकासासाठी आपण आता एकसंघ होऊया, असं आवाहन जयंत पाटलांनी यावेळी केलं.
महत्वाच्या घडामोडी –
शरद पवारांचं दिल्लीत कोणीपण नाव घेत नाही; नारायण राणेंचा टोला
निलंबनाची कारवाई करून एसटी चालू करण्याचा राज्य सरकारचा केविलवाणा प्रयत्न- प्रवीण दरेकर
‘ही विधानसभा शेवटची’; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याच्या घोषणेमुळं राजकीय खळबळ