आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची आज भेट घेतली. त्यानंतर आता काँग्रेस नेते व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे.
हे ही वाचा : शरद पवारांचं दिल्लीत कोणीपण नाव घेत नाही; नारायण राणेंचा टोला
सध्या राज्यात विधानपरिषद निवडणुक होणार असून राज्यात एकूण 6 जागांवर ही निवडणूक होणार आहे. ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी काँग्रेसने रणनिती आखण्यास सुरूवात केली आहे.
काँग्रेस आमदार शरद रणपिसे यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या जागेसाठी काँग्रेसकडून दिवंगत राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना उमेदवारी देण्यात आलीय. ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी नाना पटोले यांच्यापाठोपाठ बाळासाहेब थोरात यांनी फडणवीसांची भेट घेतली.
महत्वाच्या घडामोडी –
निलंबनाची कारवाई करून एसटी चालू करण्याचा राज्य सरकारचा केविलवाणा प्रयत्न- प्रवीण दरेकर
‘ही विधानसभा शेवटची’; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याच्या घोषणेमुळं राजकीय खळबळ
“शिवसेनेला 5 वर्षे मुख्यमंत्रिपद देऊन भाजपने पुन्हा महायुतीचं सरकार स्थापन करावं”