Home महाराष्ट्र आजारी मुख्यमंत्री, आजारी सरकार; नारायण राणेंची टीका

आजारी मुख्यमंत्री, आजारी सरकार; नारायण राणेंची टीका

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : महाविकास आघाडी सरकारकडे विकासाचे कोणतेही धोरण नाही. आजारी मुख्यमंत्री, आजारी सरकार अशी या सरकारची अवस्था आहे, असा हल्लाबोल केंद्रीय सूक्ष्म, लघु, मध्यम विकास मंत्री नारायण राणे यांनी राज्य सरकारवर केला. सिंधुदुर्गातील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला नारायण राणे उपस्थित होते. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली.

त्रिपुरा घटनेचे पडसाद राज्यात घडले. ठिकठिकाणी दंगली उसळल्या. मात्र या घटनेचे खापर भाजपवर फोडण्यात आले. दंगलीला कोण कारणीभूत आहे आणि या सर्व गोष्टींकडे सरकार काय दृष्टीने पाहते हे सर्वांना माहीत आहे, राज्यात अनेक प्रश्न आहेत. मात्र या सरकारला त्याच्याशी काहीच देणेघेणे नाही. हे सरकार अधिवेशन घेण्याच्या मानसिकतेत नाही. हे आजारी सरकार आहे. आजारी मुख्यमंत्री, आजारी सरकार आहे, असं नारायण राणे म्हणले आहेत.

हे ही वाचा : हिंमत असेल तर केंद्रातील सरकार बरखास्त करून बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या- नाना पटोले

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी निधी जाहीर करण्यात आला. मात्र जाहीर केलेल्या निधीमधून कमी निधी देण्यात आला. जिल्ह्याचा विकासा फंड हा दिवसेन् दिवस कमी होत आहे. या वर्षी नोव्हेंबर महिन्यात फक्त 9 टक्के खर्च झाला आहे. यावरून या सरकारची ग्रामीण विकासाची भूमिका काय हे स्पष्ट होते, असंही नारायण राणेंनी म्हटलं आहे.

जिल्ह्यात वादळ आलं, अतिवृष्टी झाली तरी दखल घेतली जात नाही. पुरेसे पैसे दिले जात नाहीत. जिल्हा नियोजनाची बैठक ही फक्त नावापुरतीच आहे. आधी पैसे जाहीर करायचे आणि नंतर मागून घ्यायचे, असं ठाकरे सरकारचं धोरण असल्याची टीकाही नारायण राणेंनी यावेळी केली.

महत्वाच्या घडामोडी –

राज्यात सरकारचं अस्तित्व नाही अन् उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री मानायला कुणीही तयार नाही- देवेंद्र फडणवीस

उद्धव ठाकरे आमच्या सोबत राहिले असते तर…; रामदास आठवलेंचं मोठं विधान

राष्ट्रवादीच्या सहकार पॅनेललाच सर्वाधिक मते मिळणार- शिवेंद्रराजे भोसले