Home महाराष्ट्र पेट्रोलच्या किंमती अमेरिका ठरविते, त्यामुळे केंद्राला दोष देणं चुकीचं- रावसाहेब दानवे

पेट्रोलच्या किंमती अमेरिका ठरविते, त्यामुळे केंद्राला दोष देणं चुकीचं- रावसाहेब दानवे

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

औरंगाबाद : काँग्रेस आणि शिवसेनेने काढलेल्या महागाईच्या मोर्चा काढला. यावर प्रतिक्रिया देताना केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी एक अजब वक्तव्य केलं आहे.

हे ही वाचा : बाबांच्या विमानात पेंग्वीनची मजा जनतेच्या नशिबात आघाडीची सजा; नितेश राणेंचा टोला

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती या अमेरिका ठरवते, केंद्र सरकार काही रोज या किंमती कमी जास्त करत नाही, त्यामुळे सरकारला यासाठी दोषी ठरवणे योग्य नाही, असा दावा रावसाहेब दानवे यांनी केला आहे. ते औरंगाबादमध्ये बोलत होते.

इंधनाच्या वाढत्या दरांवर यांनी मोर्चे काढले. पण काँग्रेसच्या काळात पेट्रोल-डिझेलच्या किंमती जागतिक बाजारपेठेशी जोडल्या आहेत. केंद्र सरकार रोज किंमती वाढवण्याचे काम करत नाही. केंद्र सरकार रोज किंमती खालीवर करत नाही, पेट्रोलच्या किंमती अमेरिका ठरवते. त्यामुळे इंधन दरवाढीचा दोष केंद्र सरकारला देणे योग्य नाही. असे असतानाही आपण केंद्र सरकारने आपला कर कमी केला. पण राज्य सरकार राज्यातील कर कमी करण्यास तयार नाही. हा देश केवळ केंद्र सरकारच्या पैशांवर चालतो. राज्य सरकारमधील तिन्ही पक्ष एकत्र बसून काहीही निर्णय घेत नाहीत, अशी टीकाही दानवेंनी यावेळी केली.

महत्वाच्या घडामोडी –

राष्ट्रवादीला मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या ‘या’ जिल्हाध्यक्षांचा भाजपमध्ये प्रवेश

राज्यातील तीन पक्षाच्या सरकारलाही आमचा धाक- चंद्रकांत पाटील

उल्हासनगरमध्ये चौकाचौकात झळकणार राष्ट्रवादीचे चमकणारे घड्याळ