Home महाराष्ट्र सत्तेसाठी नाना पटोले तलवार मान्य करतात; प्रवीण दरेकरांचा हल्लाबोल

सत्तेसाठी नाना पटोले तलवार मान्य करतात; प्रवीण दरेकरांचा हल्लाबोल

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या मुद्द्यावरून भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

हे ही वाचा : “मोठी बातमी! मुख्यमंत्री कार्यालय आणि वर्षा निवासस्थानी पुन्हा एकदा कोरोनाची एन्ट्री”

ठाकरे सरकार हिवाळी अधिवेशनापासून पळ काढण्याचा प्रयत्न करीत आहे. अधिवेशनात एसटी कर्मचारी व अन्य अनेक विषय असल्यामुळे सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे. याबाबत हिवाळी अधिवेशनात आम्ही भूमिका घेण्यापेक्षा काँग्रेसने याबाबत पाऊल उचलणे गरजेचे आहे. कारण काँग्रेसला विदर्भातील जनतेने जनाधार दिला आहे, असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.

हिवाळी अधिवेशनासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ठोस भूमिका घेणे गरजेचे आहे. पण सत्तेसाठी ते तलवार मान्य करतील, असा हल्लाबोल दरेकरांनी यावेळी केला. तसेच नाना पटोले हे सत्तेत टिकण्यासाठी एकमतावर येतात, असंही दरेकर म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

शिवचिंतनात रमलेला असा अलौकिक शिवआराधक होणे नाही; मुुख्यमंत्र्यांकडून पुरंदरेंना श्रद्धांजली

भाजपमध्ये इन्कमिंग सुरूच; आता पिंपरीतील ‘या’ मोठ्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

शिवछत्रपतींचा सेवक आज साक्षात छत्रपतींची सेवा करण्यासाठी निघाला; राज ठाकरेंची भावनिक पोस्ट