मुंबई : अजूनही वेळ गेलेली नाही शहाणे व्हा. कुतूहल म्हणून घराबाहेर पडू नका. हा अत्यंत संसर्गजन्य रोग आहे. या सर्वांचा परिणाम अगदी वाईट असेल. स्मशानात जाळायला लाकडं शिल्लक राहणार नाही, असं म्हणत अभिनेते नाना पाटेकर यांनी जनतेला आवाहन केलं.
उगाच बाहेर पडू नका. जेव्हा बाहेरुन तुम्ही घरात जाता तेव्हा स्वत:बरोबर हा रोग घेऊन जाता आणि संपूर्ण कुटुंबाबरोबरच समाजाला धोक्यात घालताय. त्यामुळेच अशावेळी कारण नसताना बाहेर पडणाऱ्यांना दोन लाठ्या मारल्या, मुस्काट फोडलं तर काय चुकलं त्याचं?, असा सवाल नानांनी यावेळी व्यक्त केला.
पोलीस पण माणसंच आहेत ना. त्यांना नाही का हा रोग होऊ शकत. किती काळजी घेणार ते सुद्धा. सकाळी उठल्यापासून ते घऱाबाहेर आहेत. गरिबांना अन्न पोहचवणं हे पोलिसांचं काम आहे का? नाही ना. पण ते करतायत, असं नाना पाटेकर म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी-
‘या’ ठिकाणी होणार करोनाचं निदान करणाऱ्या तपासणी प्रयोगशाळा; पाहा जिल्हानिहाय यादी
“इस्लामपूरातील 25 रुग्णांपैकी 4 रुग्ण कोरोनामुक्त; लॉकडाऊनचे पालन करणाऱ्या सांगलीकरांचे आभार”
महाराष्ट्र सरकार काय भूकबळीची वाट पाहतंय का? राम कदमांचा सवाल
महाराष्ट्रात लॉकडाउनचा कालावधी वाढवावा लागणार- राजेश टोपे