आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : गडचिरोलीत नक्षलवादी शोध मोहिमेला काल रोजी मोठे यश मिळाले. या मोहिमेत पोलिसांनी तब्बल 26 नक्षलवादी ठार केले आहेत. यावर गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
गडचिरोली पोलिस आणि सी 60 जवानांचं अभिनंदन करत विकासाला अडथळा आणणाऱ्या नक्षली कारवायांचा शासन कठोरपणे बिमोड करेलच, असा निर्धार एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
हे ही वाचा : भाजपचा शिवसेनेला मोठा दणका; शिवसेनेचे ‘हे’ बडे नेते भाजपात
कोरची तालुक्यातील मरदिनटोला जंगलात गडचिरोली पोलिसांच्या सी 60 पथकाच्या जवानांनी शनिवारी 13 नोव्हेंबर रोजी 26 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले आहे. गडचिरोली पोलिस आणि सी 60 जवानांचं मनापासून अभिनंदन. पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणेचं देखील हे मोठं यश आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
दरम्यान, या कारवाईत चार पोलिसही जखमी झाले आहेत. त्यांच्यावर नागपूर येथे उपचार सुरू आहेत. शासन त्यांच्या उपचारामध्ये कुठलीही कमतरता ठेवणार नाही, अशी ग्वाही एकनाथ शिंदे यांनी दिली. नक्षलवाद्यांविरोधातली कारवाई यापुढेही अशीच सुरू राहील, असा निश्चयही त्यांनी व्यक्त केला.
कोरची तालुक्यातील मरदिनटोला जंगलात गडचिरोली पोलिसांच्या सी ६० पथकाच्या जवानांनी शनिवारी १३ नोव्हेंबर रोजी २६ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले आहे. गडचिरोली पोलिस आणि सी ६० जवानांचं मनापासून अभिनंदन. पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणेचं देखील हे मोठं यश आहे.
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) November 13, 2021
महत्वाच्या घडामोडी –
महाविकास आघाडी सरकार हे राक्षशी प्रवृत्तीचे; गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल
“उद्धव ठाकरे राज्यातच नाही तर राष्ट्रीय राजकारणातही प्रगती करतील”
अखेर अमोल कोल्हेंनी सांगितलं एकांतवासाचं गुपित; म्हणाले…