Home नाशिक राज्यातील 95 टक्के मुसलमान प्रामाणिक, 5 टक्के मुस्लिम गडबड करतात- चंद्रकांत पाटील

राज्यातील 95 टक्के मुसलमान प्रामाणिक, 5 टक्के मुस्लिम गडबड करतात- चंद्रकांत पाटील

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नाशिक : त्रिपुरातील घटनेच्या निषेधार्थ काल मुस्लिमांनी अमरावती जिल्ह्यात मोठा मोर्चा काढला होता. या मोर्चावेळी आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केल्याने पोलिसांनी जमावावर लाठीमार केला होता. त्यामुळे शहरात प्रचंड हिंसाचार झाला होता. या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.

हे ही वाचा : एसटी कर्मचाऱ्यांना कोणीतरी भडकवतंय; अजित पवारांचा गंभीर आरोप

राज्यातील सर्वच मुसलमान वाईट आहेत असं नाही. 95 टक्के मुस्लिम प्रामाणिक आहेत. तर 5 टक्के मुस्लिम गडबड करतात, असं विधान चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

तुम्हाला राज्य करायचं असेल तर करा. मुस्लिमांची मतेही मिळवा. कोण नाही म्हणतंय. राज्यात 95 टक्के मुस्लिम प्रामाणिक आहेत. तर 5 टक्के मुस्लिम गडबड करतात. 5 टक्के मुस्लिम गडबड करतात, त्यावर तुम्ही टीका पण नाही करणार का?, असा सवाल करतानाच मालेगाव, नांदेडमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यामुळे पूर्वीसारखी टीका करा, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

पायातली ‘कोल्हापूरी चप्पल’ हातातही घ्यायला शिका; राजू शेट्टींचा शेतकऱ्यांना सल्ला

भाजपकडून दंगलीचं राजकारण सुरू, जनतेनं भाजपच्या षडयंत्राला बळी पडू नये- नाना पटोले

एसटी संप; सह्याद्री अतिथीगृहावरील बैठक संपली; अनिल परबांनी बैठकीबाबत दिली माहिती; म्हणाले…