आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
अहमदनगर : राज्यभरातील एसटी कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी कामबंद आंदोलन करत आहेत. तसेच आतापर्यंत जवळपास 38 एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यावरून विरोधी पक्ष भाजपकडून आघाडी सरकारवर वारंवार टीका होत आहे. यावरून आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली.
हे ही वाचा : पायातली ‘कोल्हापूरी चप्पल’ हातातही घ्यायला शिका; राजू शेट्टींचा शेतकऱ्यांना सल्ला
कर्मचाऱ्यांचे आंदोलन चिघळतच चालले आहे. त्यांना कोणी तरी भडकविण्याचे काम करत आहेत. राज्य सरकारकडून त्यांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न सुरू आहेत. आंदोलकांनी प्रवाशांचे हितही पहावे लागते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मी, अनिल परब, अशोक चव्हाण यांनी या प्रकरणात लक्ष घातले आहे, असं अजित पवार म्हणाले. जामखेड येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन अजित पवार व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
दरम्यान, काही समाज कंटक तेढ निर्माण करण्याचे काम करीत आहेत. तरुणांना भडकवण्यात येते. त्यामुळे दंगल होते. या दंगलींचा फटका सर्वात प्रथम गरिबालाच बसतो, असंही अजित पवारांनी यावेळी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
भाजपकडून दंगलीचं राजकारण सुरू, जनतेनं भाजपच्या षडयंत्राला बळी पडू नये- नाना पटोले
एसटी संप; सह्याद्री अतिथीगृहावरील बैठक संपली; अनिल परबांनी बैठकीबाबत दिली माहिती; म्हणाले…
…तरच भाजप-मनसे युती शक्य; रावसाहेब दानवेंचं मोठं वक्तव्य