मुंबई : त्रिपुरातील घटनेच्या निषेधार्थ काल मुस्लिमांनी अमरावती जिल्ह्यात मोठा मोर्चा काढला होता. या मोर्चावेळी आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केल्याने पोलिसांनी जमावावर लाठीमार केला होता. त्यामुळे शहरात प्रचंड हिंसाचार झाला होता. यानंतर भाजपकडून अमरावची बंदची हाक देण्यात आली होती. या बंदवेळेही अनेक हिंसक घटना घडल्या. यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली.
त्रिपुरात घडलेल्या घटनेचे पडसाद म्हणून महाराष्ट्र अमरावती, नांदेड, मालेगावसह काही भागात वातावरण पेटवण्याचा प्रयत्न केला जात आहे., असा आरोप नाना पटोलेंनी यावेळी केला.
हे ही वाचा : एसटी संप; सह्याद्री अतिथीगृहावरील बैठक संपली; अनिल परबांनी बैठकीबाबत दिली माहिती; म्हणाले…
दरम्यान, उत्तर प्रदेशसह 5 राज्यात विधानसभेच्या निवडणुका लवकरच होत आहे. दंगली पेटवून निवडणुकीत त्याचा फायदा घेण्याचा भाजपाचा नेहमीप्रमाणे डाव आहे. म्हणूनच त्रिपुरा घटनेच्या आडून महाराष्ट्रात दंगली पेटवून त्यावर उत्तर प्रदेशात आपली राजकीय पोळी भाजण्याचे भाजपचे षडयंत्र असल्याचा गंभीर आरोप नाना पटोलेंनी यावेळी केला. तसेच या षडयंत्राला राज्यातील जनतेने बळी पडू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये, शांतता राखावी, असं आवाहनही नाना पटोलेंनी यावेळी केला.
महत्वाच्या घडामोडी –
…तरच भाजप-मनसे युती शक्य; रावसाहेब दानवेंचं मोठं वक्तव्य
महापालिका निवडणुकीत शिवसेनेला धूळ चारणार; भाजपाच्या ‘या’ मोठ्या नेत्याने फुंकलं रणशिंग
दंगलखोरांना थांबण्याचा प्रयत्न केला तर मते जातील अशी तिन्ही पक्षांना भीती- चंद्रकांत पाटील