Home महाराष्ट्र महाराष्ट्र सरकार काय भूकबळीची वाट पाहतंय का? राम कदमांचा सवाल

महाराष्ट्र सरकार काय भूकबळीची वाट पाहतंय का? राम कदमांचा सवाल

मुंबई : मोदी सरकारने दिलेले मोफत धान्य तुम्हाला वाटायला अडचण काय?, असा सवाल करत भाजपचे आमदार राम कदम यांनी राज्य सरकारवर टिका केली आहे.

मोदी द्वेषापोटी केंद्र सरकारने दिलेले मोफत धान्य अजून पर्यंत महाराष्ट्र सरकार गोरगरिबांना वाटायला तयार नाही. महाराष्ट्र सरकार काय भूकबळीची वाट पाहतंय का? मोदी द्वेषापोटी तुम्ही दिवे लावणार नाही आम्ही समजू शकतो. मात्र मोदी सरकारने दिलेले मोफत धान्य वाटायलाच पाहिजे, असं राम कदम म्हणाले.

दरम्यान, मोफत धान्य कधी देणार हे सरकारला विचारलं तर 15 एप्रिल नंतर देणार, असं सरकारने सांगितलं आहे. पण तोपर्यंत काय बोंबा मारायच्या का? रेशन कार्ड असेल नसेल सरसकट प्रत्येकाला मोफत धान्य महाराष्ट्र सरकारने दिलेच पाहिजे, अशी आग्रही मागणी राम कदम यांनी केली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

महाराष्ट्रात लॉकडाउनचा कालावधी वाढवावा लागणार- राजेश टोपे

जात, धर्म, भाषा, प्रांतवाद बाजूला ठेवून सर्वांनी योगदान द्यावं; अजित पवारांच जनतेला आवाहन

तेढ निर्माण करणारे खोटे व्हिडिओ सोशल मीडियावर पसरवू नका, नाहीतर…

अशा लोकांना गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे; मरकजमधल्या प्रकारावर राज ठाकरे संतापले