आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
बुलडाणा : गेल्या सुमारे दोन वर्षांपासून आपण कोविडचा मुकाबला करतो आहोत. एकीकडे या विषाणूशी लढाई सुरू असताना दुसरीकडं आपलं जीवनचक्र सुरू राहावं, राज्यातली विकासकामं सुरूच राहावीत म्हणून आम्ही सगळे कुठेही न थांबता सातत्यानं प्रयत्न करतोय. मानदेखील वर करायला वेळ मिळत नव्हता, साहजिकच माझ्या मानेच्या दुखण्याकडे नाही म्हणलं तरी थोडंसं दुर्लक्ष झालं आणि मानेवर जो परिणाम व्हायचा तो झालाच, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी म्हटलं होतं. त्यावरुन भाजप नेते किरीट सोमय्या उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय.
हे ही वाचा : महाविकास आघाडीची वसुली जोरात तर कर्मचाऱ्यांची दिवाळी फिकी; ‘या’ नेत्याची टीका
उद्धव ठाकरे यांचं सरकार राज्याच्या सत्तेवर आले, तेव्हापासून राज्यात वसुली जोरात सुरु आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोरोना काळात पैसे मोजण्यात खूपच व्यस्त होते, त्यामुळे त्यांना मान वर करायला वेळही मिळाला नाही त्यामुळे त्यांना मानेच दुखणं सुरू झाले आहे. ते लवकर बरे होवोत, असं म्हणत किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.
दरम्यान, उद्धव ठाकरे सरकारमधील आतापर्यंत 28 मंत्र्यांचे घोटाळे मी उघड केले. येत्या 31 डिसेंबरपर्यंत मी या अलिबाबा चाळीस चोर सरकारमधील 40 चोरांचे चेहरे उघड करणार आहे. यामध्ये वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, अशी एका एकांची चौकशी सुरू आहे, पुढे काय काय होते ते बघू, असा सूचक इशाराही सोमय्या यांनी यावेळी दिला.
महत्वाच्या घडामोडी –
“एसटी कर्मचाऱ्यांसाठी मनसे आक्रमक; विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी मनसेचं आंदोलन”
‘महाराष्ट्र सरकारने मुस्लिम मोर्चे थांबवले नाहीत तर…; नितेश राणेंचा राज्य सरकारला इशारा
राष्ट्रवादीचे भाजपच्या नगरसेवकांना फोडण्याचे स्वप्न भंगले; भाजपच्या ‘या’ नेत्याची टीका