आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
औरंगाबाद : एसटीचे सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या प्रमुख मागणीसाठी राज्यात एसटी कर्मचाऱ्याचा बेमुदत संप सुरु आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनाला मनसेनं पाठिंबा दर्शविला आहे.
हे ही वाचा : ‘महाराष्ट्र सरकारने मुस्लिम मोर्चे थांबवले नाहीत तर…; नितेश राणेंचा राज्य सरकारला इशारा
एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करून घ्या, या प्रमुख मागणीसाठी मनसेच्या वतीने 11 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार मनसेचे पदाधिकारी जिल्ह्यातील आगाराला भेट देऊन कर्मचाऱ्यांचा आंदोलनाला पाठिंबा असल्याचे पत्र देत आहेत.
दरम्यान, जोपर्यंत राज्य सरकार एसटी कामगारांच्या बाजूने निर्णय घेत नाही तोपर्यंत मनसे या आंदोलनात सहभागी असेल, असं मनसेकडून सांगण्यात आलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
राष्ट्रवादीचे भाजपच्या नगरसेवकांना फोडण्याचे स्वप्न भंगले; भाजपच्या ‘या’ नेत्याची टीका
मोठी बातमी! राज ठाकरेंनी घेतली शरद पवारांची भेट; एसटी कर्मचाऱ्यांचा संप लवकरच मिटण्याची शक्यता
कोणाच्याही इच्छेने महाविकास आघाडीचे सरकार पडणार नाही; जयंत पाटलांचा भाजपला इशारा