आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राज्याच्या गेल्या काही दिवसांपासून एसटी बस कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. राज्य सरकारने संपकरी कर्मचाऱ्यांविरोधात कडक कारवाईला सुरूवात केली आहे. त्यामुळे हा विषय अत्यंत गंभीर होत चालला आहे. याच पार्श्वभूमीवर ने आज सायंकाळी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाईसह इतर नेते सोबत होते.
हे ही वाचा : कोणाच्याही इच्छेने महाविकास आघाडीचे सरकार पडणार नाही; जयंत पाटलांचा भाजपला इशारा
राज ठाकरे यांनी एसटी कर्मचाऱ्यांचे सर्व प्रश्न शरद पवार साहेबांना सांगितले. इतर महामंडळांप्रमाणे सातवा वेतन एसटी महामंडळाला लागू करण्यासाठी आपण लक्ष घालावे, अशी विनंती त्यांनी पवारांना केली. केवळ एसटी प्रश्नावर चर्चा केली. ते तोडगा काढतील अशी अपेक्षा राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे, अशी माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.
दरम्यान, शरद पवारांशी सकारात्मक चर्चा झाली. प्रत्येकवेळी लोकांनी शिवतीर्थावर येवून राज ठाकरेंना भेटायला हवं का? त्यांच्याकडे आलेल्या विषयाचा ते पाठपुरावा करतात. गंभीर विषय असल्याने ते लगेच पवार साहेबांना भेटायला आले. सातवा वेतन आयोग लागू केल्यास त्यांचा पगारवाढ होईल. मग ते संप मागे घेतील. पवार मार्ग काढतील असे चर्चेनंतर वाटत आहे. राज ठाकरे व शरद पवार दोघेही मुख्यमंत्र्यांना यासंदर्भात भेटतील, असंही बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
पुण्यात राष्ट्रवादीची आक्रमक भूमिका; वादग्रस्त वक्तव्यप्रकरणी कंगनाच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन
“राज ठाकरे घेणार शरद पवार यांची भेट; एसटी कामगारांचा संप मिटणार?”
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या तब्येतीबाबत डाॅक्टरांनी दिली महत्त्वाची बातमी; म्हणाले…