त्या व्हिडीओशी भाजपचा काहीही संबंध नाहीये- चंद्रकांत पाटील

0
265

मुंबई : दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी  छत्रपती शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा लावण्यात आला. तसंच तानाजी मालुसरे यांच्या चेहऱ्यांवर गृहमंत्री अमित शहा यांचा चेहरा लावण्यात आल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण झाला आहे. त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केलं आहे.

भाजप त्या व्हिडीओचा दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी वापर करणार नाही. या व्हिडीओचा भाजप निषेध करत आहे. या व्हिडीओशी भाजपचा काहीही संबंध नाहीये,  असा दावा चंद्रकांत पाटलांनी केला आहे.

या व्हिडीओवरून भाजपला जाब विचारणं हे अत्यंत चुकिचं आणि खोडसाळपणाचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांशी कोणाचीच तुलना होऊ शकत नाही, असंही ते म्हणाले.

दरम्यान, पोलिटिकल कीडा या ट्विटर हँडलवरुन तानाजी चित्रपटातील दृष्यांना मॉर्कींग करुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा आणि तानाजी मालुसरे यांच्या चेहऱ्यांवर गृहमंत्री अमित शहा यांचा चेहरा लावण्यात आला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

पुस्तक झालं आता व्हिडीओ हे अशोभनीय; संभाजीराजे भडकले

हा तानाजी मालुसरेंचाअपमान शिवरायांवर प्रेम करणारी जनता खपवून घेणार नाही- सुप्रिया सुळे

रोहित पवारांनी फडणवीसांवर केलेल्या टँकर घोटाळ्याची चौकशी होणार

राजिनामा देताच सांगलीच्या महपौर संगिता खोत यांना झाले अश्रू अनावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here