Home महाराष्ट्र कोणाच्याही इच्छेने महाविकास आघाडीचे सरकार पडणार नाही; जयंत पाटलांचा भाजपला इशारा

कोणाच्याही इच्छेने महाविकास आघाडीचे सरकार पडणार नाही; जयंत पाटलांचा भाजपला इशारा

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राज्यात महाविकास आघाडी सरकार भक्कमपणाने काम करत असताना ते पाडण्यासाठी भाजप सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र कोणाच्याही इच्छेने हे सरकार बरखास्त होणार नाही.  राज्य सरकार घटनेच्या चौकटीत राहून काम करत आहे. त्यामुळे सरकार बरखास्त करण्याचे अधिकार कोणालाही नाहीत. विधानसभेत जोवर आमच्या महाविकास आघाडीचे बहुमत आहे तोवर सरकार जाणे शक्य नाही, असे जयंत पाटील यांनी सांगितले. असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला. ते माध्यमांशी बोलत होते.

हे ही वाचा : पुण्यात राष्ट्रवादीची आक्रमक भूमिका; वादग्रस्त वक्तव्यप्रकरणी कंगनाच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन

राजकीयदृष्ट्या प्रेरित होऊन, यंत्रणेचा वापर करून राज्य सरकारमधील नेत्यांना बदनाम करण्याचे काम सुरू आहे याची जाणीव जनतेला झाली आहे. खोटे आरोप करणे, आर्थिकदृष्ट्या अडकवणे, अशा गोष्टी केवळ सरकार पाडण्यासाठी केल्या जात आहेत. एखाद्या गोष्टीचा टोकाचा अर्थ काढून छापेमारी केली जाते, हे जनतेने ओळखलं आहे, असं जयंत पाटील म्हणाले.

दरम्यान, राज्यात महाविकास आघाडी सरकार भक्कमपणाने काम करत असताना ते पाडण्यासाठी भाजप सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. राजकीयदृष्ट्या प्रेरित होऊन, विविध यंत्रणांचा वापर करून राज्य सरकारमधील नेत्यांना बदनाम करण्याचे काम सध्या सुरू आहे. हे सगळं जनता बघत आहे. खोटे आरोप करणे, आर्थिकदृष्ट्या अडकवणे, अशा गोष्टी केवळ सरकार पाडण्यासाठी केल्या जात आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

 “राज ठाकरे घेणार शरद पवार यांची भेट; एसटी कामगारांचा संप मिटणार?”

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या तब्येतीबाबत डाॅक्टरांनी दिली महत्त्वाची बातमी; म्हणाले…

भाजपच्या माजी मंत्र्यानं मंदिराच्या नावाखाली मोठी जमीन हडपली; नवाब मलिकांच्या आरोपामुळं खळबळ