आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुन्हा एकदा वेगळीच भूमिका घेत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. कारखान्यांच्या दोन निवडणुकांपाठोपाठ आज झालेल्या पंचायत समिती उपसभापतीच्या निवडणुकीतही राष्ट्रवादीने भाजपचे नेते आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटलांना साथ दिली.
राष्ट्रवादीने या निवडणुकीत उमेदवारच दिला नाही, त्यामुळे उपसभापतीही बिनविरोध निवडून आणण्यास पाटील यांना यश मिळाले आहे. राष्ट्रवादीने घेतलेल्या राजकीय भूमिकेमुळे इंदापुरात हर्षवर्धन पाटील यांनी तीन निवडणुका बिनविरोध करत हॅट्ट्रीक साधली आहे.
हे ही वाचा : “स्टाॅयनिस-वेडची मॅच विनिंग खेळी; पाकिस्तानला हरवून ऑस्ट्रेलियाचा फायनलमध्ये प्रवेश”
राष्ट्रवादी काँग्रेसने नुकत्याच झालेल्या कर्मयोगी कारखाना निवडणुकीतही हर्षवर्धन यांच्या पॅनलविरोधात आपले पॅनेल उभे केले नव्हते. तत्पूर्वी नीरा-भीमा कारखानाही बिनविरोध झाला होता. इंदापूर पंचायत समितीच्या उपसभापती निवडणुकीत आजही राष्ट्रवादीने उमेदवार न दिल्याने ही निवडणूकही बिनविरोध झाली आहे. त्यामुळे पंचायत समितीवर भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची निर्विवाद सत्ता राहिली.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकीय भूमिकेची चर्चा तालुक्यात रंगली आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“स्वातंत्र्यसारख्या विषयावर बोलण्याची कंगना रनौतची औकात नाही”
“राष्ट्रवादीत पक्षप्रवेशाचा धुमधडाका; काँग्रेसच्या ‘या’ नेत्यासह 6 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश”
आता कुठे गेला राष्ट्रवादीच्या नेत्यांचा एसटी कर्मचाऱ्यांबद्दलचा पुळका?; सुधीर मुनगंटीवारांचा सवाल