आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
कराड : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीची रंगत वाढतच चालली आहे. अनेक राजकीय पक्षांचे नेते पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेतली. यानंतर उदयनराजे भोसलेंना पत्रकारांनी शिवेंद्रराजेंच्या प्रश्नावर छेडलं असता उदयनराजेंनीही आपल्या शैलीत उत्तर दिलेय.
हे ही वाचा : मनसेत प्रवेशाचा धडाका; नवी मुंबईमध्ये अनेक तरुणांचा मनसेत जाहीर पक्षप्रवेश
शिवेंद्रराजेंची भेट झाली नाही तरी त्यांना गाठणारच, असं वक्तव्य उदयनराजेंनी केलंय. भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची भूमिका या निवडणुकीत महत्त्वाची असल्यामुळे उदयनराजेंच्या विधानाला महत्त्व प्राप्त झालंय.
दरम्यान, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीची जिल्ह्यात जोरदार चर्चा असून, नेत्यांच्या गाठीभेटीही वाढल्यात. अनेक राजकीय पक्षांचे नेते या निमित्तानं पुन्हा एकदा सक्रिय झालेत. मी माझ्या बंधूंना गेले अनेक दिवस सांगतोय मी तुमच्यासोबत आहे. पण त्यांच्या लक्षातच येत नाही. मतदारांनी सांगितले तर फॉर्म विड्रॉ करेन, बाकी कोणाच्या सांगण्याने नाही, असंही उदयनराजे म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
‘जय भीम’ चित्रपटावर आव्हाडांची प्रतिक्रिया; म्हणाले.. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर नसते तर…’
शरद पवारांना पुरावे देणार, त्यांनाही कळू द्या, त्यांचे मंत्री काय कांड करतात- देवेंद्र फडणवीस
“राष्ट्रवादीला मोठा धक्का; ‘हा’ माजी आमदार करणार भाजपमध्ये प्रवेश”