आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राज्यात ऐन दिवाळीत सणामध्ये अहमदनगरमध्ये अतिशय धक्कादायक घटना घडली. अहमदनगर मधील जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात भीषण आग लागून 11 रुग्णांचा मृत्यू झाला. यावरून प्रतिक्रिया देताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्रावर निशाणा साधला होता.
हे ही वाचा : राणेंसारख्या गद्दाराची सिंधुदुर्गात डाळ शिजणार नाही; शिवसेनेची टीका
‘फक्त अश्रू ढाळू नका तर ठोस पावले काय उचलणार ते सांगा? असा प्रश्न राऊत यांनी सरकारला केला होता. यावरून आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया देत राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय.
सर्वज्ञानी..नगरच्या आगीचं खापर पण केंद्रावर फोडताहेत..वेंटीलिटर नव्हे तर राऊत यांची मानसिकताच निकृष्ट बनत चाललीय… आगीत होरपळलेल्यांची चिंता संजय राऊतांना नाहीये उलट राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोघांची मर्जी सांभाळावी लागतेय…उदय शेट्टी आणि मजनू मध्ये त्यांचा #घुंगरू_सेठ झालाय, असा हल्लाबोल चित्रा वाघ यांनी यावेळी केला.
सर्वज्ञानी..नगरच्या आगीचं खापर पण केंद्रावर फोडताहेत..वेंटीलिटर नव्हे तर राऊत यांची मानसिकताच निकृष्ट बनत चाललीय…
आगीत होरपळलेल्यांची चिंता संजय राऊतांना नाहीये उलट राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोघांची मर्जी सांभाळावी लागतेय…उदय शेट्टी आणि मजनू मध्ये त्यांचा #घुंगरू_सेठ झालाय
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) November 9, 2021
महत्वाच्या घडामोडी –
“भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल”
संजय राऊत शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्वर ओकवर; भेटीचं कारण काय? चर्चांना उधाण