आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
जळगाव : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीवर भाजपने बहिष्कार घालण्याची घोषणा केली. त्यामुळे महाविकास आघाडीचे वर्चस्व या बॅंकेवर राहणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे.
भाजपचे नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांनी निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचे जाहीर करत आमचे सर्व उमेदवार हे अर्ज माघारी घेणार असल्याचे स्पष्ट केलं.
हे ही वाचा : …आता हे सरकार कोणत्या मुहूर्ताची वाट पाहतंय; मनसेचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
दरम्यान, एकनाथ खडसे हे भाजपमध्ये असताना पक्षाचे या बॅंकेवर वर्चस्व होते. मात्र खडसे हे राष्ट्रवादीत गेल्याने भाजपची ताकद क्षीण झाली. तरीही भाजपला सामावून घेत सर्वपक्षीय पॅनल करण्याचा प्रयत्न होता. मात्र केंद्रीय तपास संस्थांकडून राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांना लक्ष्य केले जात असल्याने जळगाव जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत भाजपशी युती न करण्याचा निर्णय राष्ट्रवादी काॅंग्रेसने घेतला. त्यामुळे भाजप येथे एकाकी पडली आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“अशोक चव्हाणांकडून भाजपच्या ‘या’ आमदाराला काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर, चर्चांना उधाण”
“अरे वेड्या, भाजप हा महाराष्ट्राच्या मातीत तयार झालेला पक्ष, आम्हांला गाडण्याची भाषा करू नका”
भाजपाचा मास्टरस्ट्रोक; ‘या’ नेत्याकडे नेतृत्व सोपवत दिला राष्ट्रवादीला धक्का