आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
नाशिक : राज्य सरकार विविध पातळ्यांवर संकटांचा सामना करत आहे. अशा स्थितीत जीएसटी महाराष्ट्रात परत येण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने अडथळे आणत आहे. त्यामुळे राज्यातील भाजपाचे नेते महाराष्ट्रद्रोही आहेत, असं वक्तव्य काँग्रेस नेते कुणाल पाटील यांनी केलं आहे.
हे ही वाचा : “गुलाबराव पाटलांवरील टीकेनंतर शिवसेना आक्रमक; निलेश राणेंविरोधात मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल”
“महाराष्ट्रकडून खोऱ्याने कर जमा करणारे मोदी सरकार कर परतावा देताना मात्र महाराष्ट्राला नेहमीच सावत्र वागणूक देत आलं आहे. महाराष्ट्राच्या हक्काचा 30 हजार कोटींपेक्षा जास्त निधी मोदी सरकारकडे पडून असताना उपकार केल्यासारखे केवळ 3 हजार 35 कोटी रुपये देणे हा महाराष्ट्राचा अवमान आहे.” असं कुणाल पाटील यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, यासंदर्भात कुणाल पाटील यांनी ट्विट केलं आहे.
महाराष्ट्रकडून खोऱ्याने कर जमा करणारे मोदी सरकार कर परतावा देताना मात्र महाराष्ट्राला नेहमीच सावत्र वागणूक देत आलं आहे. महाराष्ट्राच्या हक्काचा तीस हजार कोटींपेक्षा जास्त निधी मोदी सरकारकडे पडून असताना उपकार केल्यासारखे केवळ ३०३५ कोटी रुपये देणे हा महाराष्ट्राचा अवमान आहे. https://t.co/UOzTbMWhC7
— Kunal Patil (@Kunal_R_Patil) November 6, 2021
महत्वाच्या घडामोडी –
हेराफेरी-4 साठी परफेक्ट काॅम्बिनेशन, त्यात नवाबला ‘बाबू भाई’ चा रोल द्या- नितेश राणे
सांगली जिल्ह्यात शिवसेना-राष्ट्रवादीच्या गटात आणि भाजपा गटत जोरदार राडा
किरीट सोमय्या यांच्याविरोधात काँग्रेस गुन्हा दाखल करणार- नाना पटोले