आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. महापालिकेत सुरु असलेल्या भोंगळ कारभारावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.
देशपांडे यांनी ट्विटर अकाउंटवरून एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. या व्हिडीओसोबत त्यांनी ‘वीरप्पन गँगचा अजून एक कारनामा, असे कॅप्शन देत भ्रष्टाचार करणारे अनेक नगरसेवक तुम्ही पाहिले असतील. पण भ्रष्टाचाराचे पैसे चेकने घेणारे नगरसेवक तुम्ही पाहिले नसतील. लवकरच मनसे त्यांचा पुराव्यासकट पर्दाफाश करणार आहे, असं संदीप देशपांडे म्हणाले आहेत.
हे ही वाचा : हे सरकार कोणत्याही क्षणी क्षणी पडेल; नारायण राणेंचा दावा
फेब्रुवारी महिन्यात मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुका अपेक्षित आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईत सर्वच प्रमुख राजकीय पक्षांकडून पक्ष वाढीसाठी जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. भाजपा, शिवसेना, मनसे या तिन्ही पक्षासोबतच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसनेही या निवडणुकांसाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“राष्ट्रवादीचा भाजपला दे धक्का; अलिबागमध्ये शेकडो कार्यकर्त्यांनी हाती बांधलं घड्याळ”
राज ठाकरेंचं ठरलं; आजपासून कुटुंबियांसह ‘शिवतीर्था’वर राहायला जाणार
“सांगली जिल्ह्याच्या बाहेर जागा जिंकल्या नाहीत, तुम्ही आम्हाला शहाणपणा शिकवू नका”