मुबंई : करोनामुळे आरोग्य आणि पोलीस विभागावर प्रचंड ताण आलेला आहे. दोन्ही विभागातील अधिकारी आणि कर्मचारी जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यातील पोलीस दलातील कर्मचाऱ्याचा कर्तव्य मृत्यू झाल्यास 50 लाख रुपये कुटुंबीयांना देण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीनंतर याची माहिती दिली.
राज्याचे पोलीस दल कोरोनाविरुद्धच्या लढाईत जोखीम पत्करून योगदान देत आहे. आज,मंत्रालयात आयोजित बैठकीमध्ये कोरोनाशी दोन हात करताना पोलीस दलातल्या एखाद्या अधिकारी-कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असं ट्विट अजित पवार यांनी केलं आहे.
राज्याचे पोलीस दल कोरोनाविरुद्धच्या लढाईत जोखीम पत्करून योगदान देत आहे. आज,मंत्रालयात आयोजित बैठकीमध्ये कोरोनाशी दोन हात करताना पोलीस दलातल्या एखाद्या अधिकारी-कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना ५० लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) April 3, 2020
दरम्यान, सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, पोलीस विभागांना मार्च महिन्याचे उर्वरित वेतन प्राधान्यानं देण्यात यावं, असा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.
महत्वाच्या घडामोडी-
मोदी साहेब आपण पंतप्रधान आहात की एव्हेंट मॅनेजर- रुपाली चाकणकर
सांगली पोलिसांची कारवाई; आदेशाचं उल्लंघन करत सामूहिक नमाज पठण, 36 जण ताब्यात
वाटलं होतं चूल पेटवण्यासंबंधी बोलतील पण त्यांनी तर दिवा पेटवण्याचा उपदेश दिला- नवाब मलिक
“जनतेच्या आयुष्यात अंधार पसरलेला असताना वीज बंद करून दिवे लावायला सांगणे हा मूर्खपणा”