आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजपाला धक्का देत जळगाव जिल्हा बॅंकेवर आपले वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. जळगाव जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत एकनाथ खडसे यांच्या विरोधात दाखल केलेली याचिका औरंगाबाद खंडपीठाने फेटाळून लावली आहे, त्यामुळे एकनाथ खडसे यांची जळगाव जिल्हा बॅंकेवर बिनविरोध निवड झाली आहे.
हे ही वाचा : मोदींच्या विकासाची गाडी रिव्हर्स गियरमध्ये, आणि त्या गाडीचे ब्रेक देखील फेल- राहुल गांधी
या निवडणुकीसाठी मुक्ताईनगर विविध कार्यकारी सोसायटी मतदार संघातून एकनाथ खडसे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला . त्यांच्या विरोधात नाना पाटील यांनी अर्ज दाखल केला होता.
दरम्यान, भुसावळ येथील एका पतसंस्थेचे कर्ज थकीत असल्याने नाना पाटील यांचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बाद केला. या निर्णयाविरोधात पाटील यांनी नाशिक विभागीय सहनिबंधक यांच्याकडे अपील केली होती . मात्र ती फेटाळण्यात आली. त्यामुळे हा भाजपासाठी मोठा धक्का मानला जातो.
महत्वाच्या घडामोडी –
“अहमदनगर जिल्हा रूग्णालयात अग्नितांडव; अतिदक्षता विभागातील 10 रूग्णांचा मृत्यू”
नरेंद्र मोदी यांना हरवणं शिवसेना किंवा शरद पवारांचं काम नाही- रामदास आठवले
“मनसेकडून शिवसेनेला टाळी, शिवसेनेच्या आवाहनाला मनसेचं समर्थन”