आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
सावंतवाडी : शिवसेनेचे तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी पत्रकार परिषदेत बोलताना, सावंतवाडीत सुरू असलेल्या अंमली पदार्थ, दारू विक्रीविरोधात आता नागरिकांनीच जनजागृती रॅली काढावी, असे आवाहन केले होते. यावर मनसेनं प्रतिक्रिया दिली.
सावंतवाडी जिल्ह्यात आपल्याच पक्षाचे खासदार आणि आमदार असूनही शिवसेनेला गैरप्रकार, अंमली पदार्थ आणि दारुविरोधात जनजागृती रॅली काढण्यासाठी आवाहन करावं लागणे, हे दुर्भाग्यपूर्ण आहे. या आवाहनाला मनसे सुध्दा पाठिंबा देण्यास तयार आहे., असं मनसेचे शहराध्यक्ष आशिष सुभेदार यांनी म्हटलं.
हे ही वाचा : समीर वानखेडे यांना आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातून हटवलं; नवाब मलिकांचं सूचक वक्तव्य, म्हणाले…
सावंतवाडीत आणि जिल्ह्यात शिवसेनेच्या नेत्यांचा म्हणावा तसा अंकुश राहिलेला नाही. त्यांच्या नेत्यांकडून काही होणार नाही हे त्यांनी अप्रत्यक्ष कबूल केल्यामुळे आता आम्ही त्यांच्याकडून होणाऱ्या आंदोलनास मनसेकडून पाठिंबा देण्यास तयार आहोत, असं सुभेदार यांनी यावेळी स्पष्ट केलं.
महत्वाच्या घडामोडी –
राष्ट्रवादीचे नागपूर मिशन; शिवसेनेतून आलेल्या नेत्यावर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी
“मोठी बातमी! समीर वानखेडे यांना आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातून हटवलं”
भाजपाला महाराष्ट्राच्या मातीत गाडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही- धनंजय मुंडे