आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर भ्रष्ट्राचाराचे आरोप करताना राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंच्या शर्ट-पँट, घड्याळाच्या किमती हजारो रुपये असल्याचं सांगितलं होतं. त्यावरुन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी टीका केली होती. त्या टीकेला नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
नारायण राणेंसारखे भित्रे लोक आता मंत्रिमंडळात राहिलेले नाहीत. राणे घाबरले म्हणून त्यांनी भाजमध्ये पक्ष प्रवेश केला. आता त्यांना केंद्रीय मंत्रिपदाच्या स्वरुपात बक्षिसी मिळाली म्हणून ते काहीही बोलत आहेत.राजकारणात कोणी कोणाचा मित्र नसतो. कारवाईच्या भीतीनं ज्यांनी पक्षप्रवेश करुन मंत्रिपद मिळवलं त्यांनी आम्हाला काही सांगायची गरज नाही, असं नवाब मलिक म्हणाले.
हे ही वाचा : आशिष शेलारांनी घेतली राज ठाकरेंची भेट; सांगितलं भेटीचं कारण
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे सरकार 25 वर्ष चालणार आहे. त्यामुळे नारायण राणेंनी सरकार कधी पडणार यांची काळजी करु नये, असा टोला देखील नवाब मलिक यांनी यावेळी लगावला.
दरम्यान, महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर नारायण राणे तारखा देत होते. आता सरकार पडणार मग पडणार, अशा तारीख पे तारीख देण त्यांच्याकडून सुरु होते. मात्र, राणेसाहेब तुमच्यासारखे भित्रे लोक आता राहिलेले नाहीत. हे सरकार 25 वर्ष चालणार आहे त्यामुळे भित्रे लोक ज्यांनी पक्षातंर केलं त्यांना झोपा लागत नाहीत, असंही नवाब मलिक म्हणाले आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
नातेवाईकांकडे आयकर विभागाच्या धाडी; शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…
शिवसेनेला दुसऱ्यांच्या बारशात नाचण्याची सवय- नारायण राणे
…तर तुमचे कोट तुम्हाला भांडीवालीला द्यावे लागतील; संजय राऊतांचं शेलारांना प्रत्युत्तर