आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : भाजप नेते आशिष शेलार यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर आशिष शेलार यांनी मीडियाशी संवाद साधत भेटीचं कारणही सांगितलं.
राज ठाकरे यांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी आलो होतो. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असं आशिष शेलार यांनी सांगितलं.
हे ही वाचा : उद्या भाऊबीज, बहिणीकडून शुभेच्छा आल्या काय?; धनंजय मुंडे म्हणाले…
राजकारणापेक्षाही दीपावलीमध्ये एकमेकांना भेटायचं असतं. दिवाळीनिमित्त आमची भेट ठरली होती. ‘द बूक ऑन मुव्ही’ हे जगभरातील 100 सर्वोत्कृष्ट सिनेमांवरील पुस्तक पेंग्विन पब्लिकेशनने प्रकाशित केलं आहे. हे पुस्तक मी पाहिलं होतं. मला आवडलं. त्यामुळे राज यांना मी हे पुस्तक भेट म्हणून दिलं. शिवाय त्यांच्या प्रकृतीचीही विचारपूस करून त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या, असं शेलार म्हणाले.
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि आशिष शेलार यांची मैत्री सर्वश्रृत आहे. आशिष शेलार हे दर दिवाळीला राज ठाकरेंना भेटायला कृष्णकुंजवर येत असतात. आजही त्यांनी सकाळीच कृष्णकुंज गाठलं. या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाली. दिवाळी फराळ घेत घेत या दोघांनीही गप्पा मारल्या.
महत्वाच्या घडामोडी –
शर्ट-पँट पाहण्यासाठी नवाब मलिक दुसऱ्यांच्या बेडरूममध्ये जातात, ही चांगली सवय नाही- नारायण राणे
नातेवाईकांकडे आयकर विभागाच्या धाडी; शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…
शिवसेनेला दुसऱ्यांच्या बारशात नाचण्याची सवय- नारायण राणे