Home पुणे उद्या भाऊबीज, बहिणीकडून शुभेच्छा आल्या काय?; धनंजय मुंडे म्हणाले…

उद्या भाऊबीज, बहिणीकडून शुभेच्छा आल्या काय?; धनंजय मुंडे म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

बारामती : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी आज बारामतीमध्ये येऊन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे आशीर्वाद घेतले. संपूर्ण पवार कुटुंबियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

हे ही वाचा : शर्ट-पँट पाहण्यासाठी नवाब मलिक दुसऱ्यांच्या बेडरूममध्ये जातात, ही चांगली सवय नाही- नारायण राणे

यावेळी पत्रकारांनी धनंजय मुंडेंना बहिणीकडून भाऊबीजेच्या शुभेच्छा आल्या का? असा प्रश्न विचारला. यावर धनंजय मुंडेंनी, अजूनपर्यंत तरी शुभेच्छा आल्या नाहीत. तुमच्याकडे आल्या असतील तर मला सांगा, असं म्हणत पत्रकारांचीच फिरकी घेतली.

पवारांसाहेबांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊन त्यांच्या निरोगी आरोग्यासाठी प्रार्थनाही केली, असं धनंजय मुंडेंनी यावेळी म्हटलं. शरद पवार हे शक्तीपीठ आहे. त्यावर घाला घालण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र आम्ही तो कधीही यशस्वी होणार नाही त्यासाठी वाटेल ते करु, पण पवारसाहेबांवर होणारे वैयक्तिक हल्ले रोखू, असंही मुंडे म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी – 

नातेवाईकांकडे आयकर विभागाच्या धाडी; शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…

शिवसेनेला दुसऱ्यांच्या बारशात नाचण्याची सवय- नारायण राणे

…तर तुमचे कोट तुम्हाला भांडीवालीला द्यावे लागतील; संजय राऊतांचं शेलारांना प्रत्युत्तर