आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान अटक प्रकरणी अनेक घडामोडींना वेग आला आहे. पंच प्रभाकर साईलने केलेल्या 25 कोटींच्या खंडणीच्या आरोपामुळे प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. यावरून राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.
हे ही वाचा : “औरंगाबाद पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकला; काँग्रेसच्या सभापतींचा पक्षाला रामराम”
‘प्रभाकर साईलने पोलीस ठाण्यात तक्रार दिली तर गुन्हा दाखल होऊ शकेल’ असं महत्त्वाचं वक्तव्य दिलीप वळसे पाटील यांनी केलं. तसेच या प्रकरणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत चर्चा झाली, अशी माहितीही वळसे पाटलांनी यावेळी दिली.
प्रभाकर साईल याने संरक्षण मागितले होते त्यांना पोलीसांना संरक्षण दिलं आहे. त्याने जे काही आरोप केले आहे ते गंभीर आहे जर प्रभाकर साईलने पोलीस ठाण्यात तक्रार दिली तर गुन्हा दाखल होऊ शकेल, असं वळसे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केलं.
महत्वाच्या घडामोडी –
अखेर मुख्यमंत्री ठाकरेंनी मान्य केले की ते घरकोंबडे आहेत; अतुल भातखळकरांची टीका
शिवसेनेची मोठी घोषणा; आणखी एका राज्यात लढवणार निवडणूक
स्वाभिमान विकून वसुलीसाठी….; मनसेची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका