मुंबई : जनतेच्या आयुष्यात अंधार पसरलेला असताना वीज बंद करून दिवे लावायला सांगणे हा तद्दन मूर्खपणा आहे, असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.
मास्क आणि सॅनिटायझरचा साठा किंबा त्याचा काळाबाजार अजिबात होऊ देणार नाही, असं म्हणतील किंवा कोणताही गरीब उपाशी झोपणार नाही, असं देशवासियांना आश्वस्त करतील. प्रत्येक गोष्टींचा इव्हेंट करावा, असं यांना का वाटतं?, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी केला.
दरम्यान, आजच्या भाषणात मोदीजी जीवनावश्यक वस्तूंचा साठा कमी पडू देणार नाही, असं आश्वासन देतील असं वाटलं होतं. सगळ्यांच्या जिवनात अंधार पसरला असताना प्रधानमंत्र्यांकडून येथे उजेड अणण्याची अवशक्यता आहे. अशा वेळी ते म्हणतात अंधार करा हा बालीशपणा आहे, असंही ते म्हणाले.
जनतेच्या आयुष्यात अंधार पसरलेला असताना वीज बंद करून दिवे लावायला सांगणे हा तद्दन मूर्खपणा आहे… @PMOIndia @CMOMaharashtra#अंधेरी_रात_में_दिया_तेरे_हाथ_में pic.twitter.com/IiP2il0YMJ
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 3, 2020
महत्वाच्या घडामोडी-
कोरोनाविरुद्धच्या या लढाईत भाजप राज्य सरकारसोबत आहे- देवेंद्र फडणवीस
शिधापत्रिका नसली तरी मोफत धान्य दिलं जावं; देवेंद्र फडणवीसांची राज्य सरकारला विनंती
“बेजबाबदारपणा दाखवणाऱ्यांची खैर केली जाणार नाही”
मरकजमधील व्यक्तींनी पुढे येऊन तपासणीसाठी सहकार्य करावं- उद्धव ठाकरे