आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शिवसेनेनं आपली कंबर जोरदार कसली असून पक्षाने मोर्चेबांधणीला जोरदार सूरूवात केली आहे. अशातच आता शिवसेना पक्ष आणखी मजबूत करण्यासाठी सिल्लोड आणि सोयगावातील शिवसेनेला आणखी बळकटी देण्यासाठी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी शिवतेज अभियानाला सुरुवात केली आहे.
आगामी जिल्हा परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी औरंगाबादमध्ये शिवतेज अभियानाला सुरुवात केली आहे. फुलंब्री येथे पक्ष कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन त्यांनी अभियानाला सुरुवात केली. यावेळी बोलताना सत्तार यांनी भाजपला इशारा दिला.
हे ही वाचा : ‘…म्हणून मला बाजूला करण्यात आलं’; एकनाथ खडसेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
अजूनही भाजपचे अनेकजण शिवसेनेच्या संपर्कात असून लवकरच सिल्लोड-सोयगावातून भाजप हद्दपार करणार, असा इशारा अब्दुल सत्तार यांनी यावेळी दिला. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने सिल्लोड-सोयगावातील 5 हजार भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा सत्तारांनी यावेळी केला.
महत्वाच्या घडामोडी –
अमृता फडणवीस म्हणाल्या, ‘मुंबईत ट्रॅफिकमुळे तीन टक्के घटस्फोट होतात’; आता किशोरी पेडणेकर म्हणतात…
यवतमाळ जिल्ह्यात शिवसेना पदाधिकाऱ्याची राहत्या घरात घुसून हत्या
नितेश राणे प्रकृती बिघडली; रुग्णालयात केलं दाखल