अयोध्या : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिर भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. भूमिपूजन झाल्यानंतर सरसंघचालक मोहन भागवत यांनी उपस्थितांना संबोधित केलं. यावेळी आजचा दिवस अतिशय आनंदाचा आहे. गेल्या 30 वर्षांच्या कठोर मेहनतीचं फळ मिळालं राम जन्मभूमिचा संघर्ष कधीही न विसरता येणारा आहे, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.
हा आनंदाचा क्षण आहे, एक संकल्प केला होता, तो संकल्प आज पूर्ण झाला आहे, याचा आनंद आहे. इथं मंदिर बनणार आहे, मात्र आपल्याला आपल्या मनात मंदिराचं निर्माण करावं लागणार आहे. सर्वांना आपलं मानणारा धर्म आपल्याला उभा करायचा आहे. या मंदिराच्या पूर्ण होण्याआधी आपल्याला आपलं मनमंदिर उभं करायचं आहे, असं मोहन भागवत म्हणाले.
दरम्यान, आज अनेक लोकं इथं येऊ इच्छित होते. मात्र ते येऊ शकत नाहीत. आडवाणीजी देखील हा सोहळा पाहत आहेत. असं म्हणत मोहन भागवत यांनी आडवाणी यांची आठवण काढली.
महत्वाच्या घडामोडी-
“संकटाच्या चक्रव्युहातून रामजन्मभूमी मुक्त झाली”
500 वर्षांची प्रतीक्षा संपली; योगी आदित्यनाथ व्यक्त केल्या भावना
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिर भूमिपूजन सोहळा संपूर्ण
भारत आता धर्मनिरपेक्ष राहिला नाही; राम मंदिर भूमिपूजनावरुन पाकिस्तान सरकारचं वक्तव्य