महाआघाडीचे 162 आमदारांचं हाँटेल ग्रँड हयातमध्ये शक्ति प्रदर्शन

0
154

मुंबई : शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस चे सर्व आमदार एकत्र येऊन शक्ति प्रदर्शन करणार आहेत. थोड्याच वेळात तीनही पक्षांचे आमदार आणि समर्थक पक्ष आणि अपक्ष आमदारही उपस्थित रहाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

यावेळी महाआघाडीचे 162 आमदारांचे एकत्र फोटोसेशन आणि ओळख परेड होणार आहे. सांताक्रूझ येथील ग्रँड हयात हाँटेल मधील मुख्य हाँल मध्ये हे शक्तीप्रदर्शन होईल.

महाविकास आघाडीची ताकद दाखवण्याचा प्रयत्न या आमदारांकडून केला जाणार आहे. 162 आमदारांना एकजूट राहण्याची शपथ देणार असल्याची माहिती मिळाली आहेत.

दरम्यान, दर दोन ते तीन दिवसामध्ये यांना हॉटेल बदलावे लागत आहेत.  त्यामुळे आमदारांमध्येही तणाव आणि अस्वस्थतेचे वातावरण आहे. लवकर सरकार स्थापन व्हावे आणि आमची यातून सुटका व्हावी अशी आमदारांची इच्छा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here