आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : महाराष्ट्रातील बहुप्रतिक्षित सत्तासंघर्षावरील निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय खंडपीठाने अखेर दिला.
या निकालात न्यायालयानं शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिला आहे. त्यामुळे या 16 आमदारांबाबत नार्वेकर काय निर्णय घेणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी एक मोठं विधान केलं आहे.
ही बातमी पण वाचा : “मविआच्या बैठकीत उद्धव ठाकरे ठाम; जागा वाटपांवरून आघाडीत बिघाडी?”
शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र ठरणार नाहीत. संबंधित 16 आमदार अपात्र ठरले तरी शिंदे-फडणवीस सरकारला कसलाही धोका नाही, असं विधान अजित पवार यांनी केलं. अजित पवारांच्या या वक्तव्यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मी यावर काहीही बोलू शकत नाही. हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे आहे. त्यांच्याकडे यावर सुनावणी होणार आहे. याबाबत जो काही निर्णय द्यायचा आहे, तो निर्णय विधानसभा अध्यक्ष देतील., अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.
दरम्यान, एक अभ्यासक, एक वकील आणि 25 वर्षे विधानसभेत कार्य केलेली व्यक्ती म्हणून मला असं वाटतं की, आता उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीला पुरतं समजलं आहे की, पोपट मेला आहे. तरीदेखील तो मान हलवत नाही. तो हातपाय हलवत नाहीये, अशाप्रकारच्या गोष्टी ते बोलतायत. अशा गोष्टी बोलणं त्यांना सहाजिकच आहे. कारण त्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांना दाखवावं लागतं की, आशा जिवंत आहेत, असा टोला फडणवीसांनी यावेळी लगावला.
महत्त्वाच्या घडामोडी –
“प्रसिद्ध लावणीसम्राज्ञी, गाैतमी पाटील हिनं घेतली, छत्रपती उदयनराजे भोसलेंची भेट, चर्चांना उधाण”