औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबाद येथील सभेला पोलिसांनी आज सशर्त परवानगी दिली आहे. महाराष्ट्र दिनी राज यांची ही सभा होणार असून यासाठी 16 अटी घालण्यात आल्या आहेत. यावर मनसेकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे.
औरंगाबाद येथील सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर 1 मे रोजी राज ठाकरे यांची सभा होणार आहे. या सभेसाठी 16 अटी घालण्यात आल्या असून त्यात ध्वनी प्रदूषण होणार नाही याची दक्षता बाळगावी, कोणताही धर्म, प्रांत, वंश आणि जात यावरून आक्षेपार्ह विधान करू नये, सभेच्या आधी मिरवणूक काढू नये, अशा काही प्रमुख अटींचा समावेश आहे. यावर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी पत्रकार परिषद घेऊन भाष्य केले.
हे ही वाचा : भोंग्याच्या वादात आता अमृता फडणवीसांची उडी; ठाकरे सरकारवर साधला निशाणा; म्हणाल्या…
दरम्यान, ‘पोलिसांनी सभेसाठी घातलेल्या अटी जाचक आहेत असे आम्हाला वाटत नाही. पोलिसांनी त्यांचे काम केले आहे. पोलिसांना सतर्क राहावंच लागतं आणि त्यानुसारच त्यांनी सभेबाबत अटी ठरवल्या आहेत. सभा म्हटलं की या गोष्टी येतातच. आता आम्हाला आमचं काम करायचं आहे. शक्यतो अटींचे पालन करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्यात काही अडचणी येतील असे आम्हाला वाटत नाही’, असं बाळा नांदगावकर म्हणाले आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
“भाजप-मनसे युती होणार?; राज ठाकरे लवकरच योगी आदित्यनाथांच्या भेटीला; चर्चांना उधाण”
शिवसेना-भाजप युतीसंदर्भात आशिष शेलारांचा मोठा गाैफ्यस्फोट, म्हणाले…
“हिंदूजननायक असा उल्लेख करत औरंगाबादच्या सभेसाठी पुण्यात जोरदार बॅनरबाजी; सभा होणार म्हणजे होणार?”