14 वर्षीय मुलावर महिलेनं केला बलात्कार; गरोदर राहिल्यानंतर झाला भांडाफोड

0
263

अमेरिकेमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील एका 23 वर्षीय महिलेला लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणामध्ये दोषी ठरवण्यात आलं आहे. द सनने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेतील अरकैंसास येथील पोलिसांना लहान मुलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारासंदर्भातील हेल्पलाइन क्रमांकावर एक फोन आला. या फोन कॉलवर एक 23 वर्षीय महिला 14 वर्षीय मुलासोबत शरीरसंबंध ठेवत असल्याचं आपण स्वत: पाहिलं असल्याची तक्रार एका व्यक्तीनं केली होती.

ब्रिटनी ग्रे असं या आरोपी महिलेचं नाव असून ही महिला एका वर्षाहून अधिक काळापासून या मुलावर लैंगिक अत्याचार करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर एका खबऱ्याच्या मदतीने पोलिसांनी या महिलेला रंगेहाथ पकडलं.

रॉण्डा थॉमस या खबऱ्याने न्यायालयासमोर दिलेल्या माहितीनुसार, ही महिला गरोदर असल्याचं वैद्यकीय अहवालही उपलब्ध आहेत. या अहवालांवरुन ही महिला या मुलासोबत ठेवलेल्या शरीरसंबंधांमधून गरोदर आहे हे सिद्ध होत असल्याचा दावा न्यायालयासमोर करण्यात आला आहे.

दरम्यान, इतकचं नव्हे तर याचिका दाखल करताना पोलिसांनी पुरावा म्हणून ही महिला ज्या रुग्णालयामध्ये तपासणीसाठी जायची त्याचे सीसीटीव्ही फुटेजही सादर केले आहेत. या व्हिडीओमध्ये ही आरोपी महिला त्या 14 वर्षीय मुलाबरोबर रुग्णालयामध्ये शिरताना दिसत आहे. तसेच या महिलेला कोणती शिक्षा द्यायची हा निर्णय अजून झालेला नाही.

महत्वाच्या घडामोडी –

जागतिक महिला दिनानिमित्त गुगलकडून महिलांना अनोख्या शुभेच्छा

मोठी बातमी! ‘या’ साठी शरद पवारांचा राज ठाकरेंना फोन; म्हणाले…

“माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण ताठर, गडी ऐकायलाच तयार नाही”

महिला दिनानिमित्त अमृता फडणवीसांचा नवा व्हिडीओ; पहा व्हिडिओ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here