Home महाराष्ट्र 18 पैकी 12 खासदार आणि 22 माजी आमदार आमच्यासोबत येणार; गुलाबराव पाटलांचा...

18 पैकी 12 खासदार आणि 22 माजी आमदार आमच्यासोबत येणार; गुलाबराव पाटलांचा मोठा गाैफ्यस्फोट

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

जळगाव : शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं. आणि एकनाथ शिंदे यांचं सरकार स्थापन झालं. आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले.

विधिमंडळाच्या अधिवेशनात शिंदे सरकारनं विश्वासदर्शक ठराव 164 विरूद्ध 99 अशा फरकाने जिंकला. आता अशातच शिवसेनेचे बंडखोर नेते गुलाबराव पाटील यांनी एक मोठं विधान केलं आहे.

हे ही वाचा : देवेंद्र फडणवीस वेश बदलून एकनाथ शिंदेना भेटायचे; अमृता फडणवीसांचा गौप्यस्फोट

18 खासदारांपैकी 12 खासदार आणि 22 माजी आमदार आमच्यासोबत येणार असल्याचा मोठा दावा गुलाबराव पाटलांनी यावेळी केला. तसेच विद्यमान 55 आमदारांपैकी 40 आमदार आमच्यासोबत असल्याचंही गुलाबराव पाटलांनी यावेळी नमूद केलं. ते जळगावमध्ये माध्यमांशी बोलत होते.

आमचा पक्ष बाळासाहेब ठाकरेंचा शिवसेना आहे. आम्ही हा पक्ष उभा करू. ते वैभव परत प्राप्त करू. आम्ही ‘तमाम हिंदू बंधू, भगिणी आणि मातांनो’ हे बाळासाहेब शब्द पुन्हा महाराष्ट्रात घमवू. त्यासाठीच आम्ही बाहेर पडलो आहे, असं गुलाबराव पाटलांनी यावेळी म्हटलं.

महत्त्वाच्या  घडामोडी –

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली शरद पवारांची भेट; राजकीय चर्चांना उधाण

मला कोणाच्याही खास प्रेमाची गरज नाही, शिवसैनिक आमच्या पाठीशी; आदित्य ठाकरेंचा बंडखोरांना टोला

उद्धव ठाकरे म्हणाले, रिक्षावाल्याची रिक्षा सुसाट सुटली, आता एकनाथ शिंदे म्हणतात…