Home महाराष्ट्र “विधानसभेत जोरदार राडा; भाजपच्या 12 आमदारांचं एक वर्षासाठी निलंबन”

“विधानसभेत जोरदार राडा; भाजपच्या 12 आमदारांचं एक वर्षासाठी निलंबन”

मुंबई : आजपासून विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहामध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षनेते एकमेकांवर आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं.

तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनाही धक्काबुक्की आणि शिविगाळ करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. या घटनेनंतर भास्कर जाधव यांनी आपलं मत सभागृहात मांडलं. त्यानंतर संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी भाजप आमदारांच्या निलंबनाचा ठराव मांडला आणि हा ठराव आवाजी बहुमतानं मंजूरही करण्यात आला आणि भाजपच्या 12 आमदारांचं एक वर्षासाठी निलंबन करण्यात आलं आहे.

ओबीसी आरक्षणावरील ठरावावर चर्चा सुरू असताना राजदंड उचलणे, माईक ओढणे आणि सभागृह अध्यक्षांना शिवीगाळ केल्याप्रकरणी भाजपच्या आशिष शेलार, योगेश सागर, अभिमन्यू पवार, संजय कुटे, अतुल भातखळकर, पराग अळवणी, गिरीश महाजन, राम सातपुते, हरीश पिंपळे, नारायण कुचे, जयकुमार रावत किर्तीकुमार बागडीया या 12 आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आलं आहे.

दरम्यान, या वर्षभरात त्यांना मुंबई आणि नागपूर येथील अधिवेशनात सामिल होण्यास मज्जाव करण्यात आला आहे. अनिल परब यांनी ही माहिती आज विधानसभेत दिली.

महत्वाच्या घडामोडी –

“31 जुलैपर्यंतच्या MPSC च्या रिक्त जागांबाबत अजित पवारांनी केलेली घोषणा फसवी”

गुंडगिरी करून सत्ता काबीज करता येत नाही; नवाब मलिक यांचा भाजपवर हल्लाबोल

31 जुलैपर्यंतच्या MPSC च्या सर्व रिक्त जागा भरणार; अजित पवार यांची मोठी घोषणा

“प्रसाद लाड यांच्या नातेवाईकांच्या एका कंपनीवर ईडीने कारवाई करावी, या कंपनीत 100 कोटींच्या वर अफरातफर”