मुंबई : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी परीक्षा ऑफलाईन (लेखी परीक्षा) पद्धतीनुसार होणार आहे, अशी महत्वाची माहिती दिली आहे.
वर्षा गायकवाड यांच्या महत्त्वपूर्ण घोषणा
* दहावी-बारावी परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार
* लेखी परीक्षा ही विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या शाळेतच होणार
* वर्गखोल्या कमी पडल्या तर बाजूच्या शाळेत बैठक व्यवस्था केली जाणार
* यंदा 80 गुणांच्या परीक्षेसाठी 30 मिनिटं वाढीव वेळ
* 40 आणि 50 गुणांच्या परीक्षेसाठी 15 मिनिटं वेळ वाढवून देण्यात येणार
* दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रत्येक तासाला 20 मिनिटं
* जर विद्यार्थ्याला कोरोनाची लागण झाल्यास त्यासाठी विशेष परीक्षेचे आयोजन
* विशेष परीक्षा जून महिन्यात घेण्यात येणार
दरम्यान, दहावीच्या परीक्षा 29 एप्रिल ते 21 मे दरम्यान आणि इयत्ता बारावीच्या परीक्षा 23 एप्रिल ते 20 मे या नियोजित वेळापत्रकानुसार ऑफलाईनच होणार आहे. कोविड परिस्थितीमुळे लेखी परीक्षा त्याच शाळा अथवा कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये परीक्षा केंद्र ठेवण्यात येणार आहेत, असंही वर्षा गायकवाड म्हणाल्या.
महत्वाच्या घडामोडी –
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी खूप अभ्यास केलाय; आम्हा डॉक्टरांपेक्षाही त्यांना कोरोनाचं जास्त ज्ञान”
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधील ‘भिडे मास्तर’ ला कोरोनाची लागण
“पराभवाची अब्रू वाचवण्यासाठी भाजपच्या माजी मंत्र्यांनी पळपुटेपणा केला”
“पुण्यातील भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्याविरोधात मारहाण केल्याची तक्रार”