102 डिग्री ताप, अनेकवेळा उलट्या; जाणून घ्या आता कशी आहे दाऊदची तब्येत

0
166

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला फूड पॉयजनिंग झालं असून त्याच्यावर विष प्रयोग झाल्याच, त्याला रुग्णालयात दाखल केल्याच बोलल जात होतं.

दाऊद इब्राहिमला 102 डिग्री ताप होता. अनेकवेळा उल्ट्या झाल्या. सुरक्षा कारणांमुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं नाही. उपचारांसाठी डॉक्टरांच्या टीमलाच घरी बोलवण्यात आलं. बंगल्यातील पहिला मजला वॉर्डरुममध्ये बदलण्यात आला आहे. तिथे डॉक्टरांच्या देखरेखीखाली दाऊदवर उपचार सुरु आहेत.

तीन दिवसाच्या उपचारानंतर दाऊदच्या तब्येतीत सुधारणा झाल्याच म्हटलं जातय. पण सध्या तो आराम करतोय. सततच्या उल्ट्यांमुळे दाऊद दुबळा झालाय. बेडवरुन उठण्याच्या स्थितीमध्ये नाहीय. डॉक्टरांच्या देखरेखीखाली सतत त्याच्यावर उपचार सुरु आहेत. दाऊद अजून पूर्णपणे बरा झालेला नाहीय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here