आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : मंत्रिपद न मिळाल्यानं, शिंदे गटातील आमदार नाराज होऊन, सरकार पडेल असं वक्तव्य विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया देताना मोठा गौप्यस्फोट केला आहे.
राष्ट्रवादीचे 10 ते 15 आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. असा खळबजनक दावा उदय सामंत यांनी केला आहे.
हे ही वाचा : ‘…हीच महाराष्ट्राची संस्कृती’; राज ठाकरेंच्या भूमिकेचे ठाकरे गटाकडून स्वागत
आमच्याबद्दल चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. अजित पवार चुकीचं बोलत असून उलट राष्ट्रवादीचेच 10 ते 15 आमदार मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आहेत. आपल्या कार्यकर्त्यांना ताकद द्यावी म्हणून कदाचित अजित पवार आम्ही सगळे नाराज आहोत की आमच्यातले आमदार नाराज आहेत अशा प्रकारची वक्तव्य करत आहेत, असं उदय सामंत म्हणाले आहेत.
दरम्यान, आम्ही नाराज आहोत किंवा आम्ही काहीतरी नाराजी सारखं करतोय असं सांगण्यापेक्षा आपल्याकडनं जे काही लोक या शिंदे आणि फडणवीस यांच्या संपर्कात आहेत त्यांना थांबवण्यासाठी केलेली ही वक्तव्य आहेत, असंही उदय सामंत यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
लवकरच छत्रपती शिवाजी महाराजांचा चित्रपट आणणार; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची घोषणा
मोठी बातमी! अकोटमध्ये भाजपचा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पाठिंबा
नागपूरमध्ये फडणवीसांना धक्का; पंचायत समितीत सर्व 13 जागांवर महाविकास आघाडीने मारली बाजी