पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गुरुवारी पुण्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री पुणे जिल्हा आणि विभागाचा कोरोनाचा आढावा घेणार आहेत यावरुन भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
मुख्यमंत्र्यांचा हा दौरा म्हणजे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. पुण्याची परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांचा हा दौरा केवळ दिखाव्यासाठी आहे, असं जगदीश मुळीक यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, पुणे महापालिकेत भाजपची सत्ता असल्यानं राज्य सरकारकडून भेदभाव केला जातोय. महापालिकेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 200 कोटींचा खर्च केला. मात्र राज्य सरकारने केवळ तीन कोटी रुपयांची मदत केली. मुख्यमंत्र्यांनी केवळ बैठकीचं नाटक न करता 500 कोटींची मदत जाहीर करावी, असा घणाघातही जगदीश मुळीक यांनी यावेळी केला.
महत्वाच्या घडामोडी-
नव्या शैक्षणिक धोरणाला केंद्राची मंजुरी, दहावी-बारावी बोर्डाचं महत्त्व कमी; अनेक महत्त्वाचे बदल
रिया चक्रवर्तीवर गुन्हा दाखल होताच अंकिता लोखंडेचं ट्वीट; म्हणाली…
“उद्धव ठाकरे भूमिपूजनाला गेले तर राम मंदिराचं श्रेय शिवसेनेला जाईल याची भाजपला भिती”
राज्याचा निकाल 95.30 टक्के, यावर्षीही मुलींचीच बाजी तर पुन्हा कोकण अव्वल