पासवर्ड Admin123 आणि अनेकांचे “वैयक्तिक” आयुष्य उध्वस्त.!

0
154

 

मुंबई-:  संपूर्ण देशात खळबळ उडवणारा सीसीटीव्ही फुटेज हॅकिंग घोटाळा आता महाराष्ट्रालाही हादरवून सोडतोय!सायबर गुन्हेगारांनी रुग्णालये, शाळा, ऑफिसेस आणि हॉटेल्सचे हजारो तासांचे फुटेज हॅक करून चोरले, आणि हे क्लिप्स टेलिग्राम चॅनेल्स आणि QR कोड लिंकद्वारे विक्रीसाठी ठेवले, अशी माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.

हँकर्स नी ५०,००० क्लिप्स चोरल्या बरेच क्लिप्स टेलिग्राम/पॉर्न साईटवर विकल्या आणि काही ठिकाणी QR-कोड्सद्वारे पसंत व्यक्तींना विक्री करण्यात आली. हे उल्लंघन बहुतेकदा सोप्या, डिफॉल्ट पासवर्ड्स (उदा. admin123) आणि ब्रूट-फोर्स बॉट्सच्या मदतीने झाले असल्याचे पोलिस अहवालात म्हटले आहे.

आरोपी कोण?या प्रकरणात सायबर पोलिसांनी काही धक्कादायक नावे उघड केली आहेत —

रोहित संजयकुमार सिसोदिया, दिल्लीचा मास्टरमाईंड; QR कोड तयार करून चोरलेले क्लिप्स विक्रीसाठी टाकण्याचे काम करायचा.

परित धामेलिया, सूरतचा हॅकर; हॉस्पिटल्स आणि खासगी संस्थांच्या सिस्टममध्ये घुसखोरी करून व्हिडिओ मिळवायचा तज्ज्ञ.

प्रज्वल टैली, महाराष्ट्रातील लातूरचा तरुण; यूट्यूब आणि टेलिग्रामवर व्हिडिओंचे टीझर पोस्ट करून विक्रीचे लिंक पसरवायचा.

पोलिसांनी या सर्वांना सापळा रचून ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून हजारो क्लिप्स, मोबाईल आणि लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत.

कसे चालायचे हे गोरखधंदे?

हॅकर्सनी डिफॉल्ट पासवर्ड असलेले सीसीटीव्ही सिस्टम ओळखून त्यात घुसखोरी केली, आणि क्लिप्स डाउनलोड करून QR कोडमध्ये रूपांतरित केल्या.
यानंतर हे कोड टेलिग्रामवर पेड लिंक म्हणून विकले जात होते. एका व्हिडिओची किंमत ₹700 ते ₹4000 दरम्यान होती!
काही क्लिप्स “टीझर” म्हणून YouTube वर पोस्ट करून ग्राहकांना आकर्षित केले जात होते.

पोलिस कारवाई आणि तपास

सायबर पोलिसांनी गुजरात, दिल्ली आणि महाराष्ट्रात मोठी मोहीम राबवली.
आरोपींच्या मोबाइल, लॅपटॉप आणि हार्डड्राइव्हमधून ५०,००० पेक्षा अधिक संवेदनशील व्हिडिओ क्लिप्स सापडल्या आहेत.
या नेटवर्कचे आंतरराज्य दुवे तपासले जात आहेत आणि आणखी काही आरोपींना अटक होण्याची शक्यता आहे.

नागरिकांना इशारा

पोलिसांनी नागरिकांना इशारा दिला आहे —“आपले सीसीटीव्ही सिस्टम इंटरनेटवर उघडे ठेवू नका, पासवर्ड नियमित बदला, आणि संशयास्पद लिंक किंवा QR कोडवर क्लिक करू नका!”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here