मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल तब्बल 18 तासांनी जाहीर झाला. अत्यंत अटीतटीच्या लढतीत नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीएने सत्ता कायम राखली. दुसरीकडे तेजस्वी यादव यांनीही सुरूवातीपासूनच आव्हान दिल्याचं मतमोजणी दरम्यान दिसून आलं. बिहारच्या विधानसभाच्या निवडणुक निकालावर शिवसेनेंचं मुखपत्र असलेल्या सामनातून भाष्य केलं आहे.
बिहारच्या विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. मतदानानंतर जे ‘एक्झिट’ पोल वगैरे दाखवण्यात आले त्यानुसार अटीतटीची लढत होईल असे चित्र दिसले. साधारण निकाल तसेच आले आहेत. अटीतटीच्या लढतीत ‘एनडीए’ म्हणजे भाजपा-नितीशकुमारांची आघाडी पुढे गेली आहे, पण मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या ‘जदयु’ची पीछेहाट झाली आहे. हेसुद्धा अपेक्षेप्रमाणेच घडले आहे., असं सामनामध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, बिहारवर पुन्हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे राज्य आलं आहे, पण नितीशकुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील काय, हा प्रश्न अधांतरी आहे. तसेच आता कमी जागा मिळूनही नितीशकुमारांना दिलेला शब्द पाळला गेला तर त्याचे श्रेय शिवसेनेला द्यावे लागेल., असं सामनातून म्हणण्यात आलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
“संजय राऊतांनी नगरपरिषदेत निवडून यावं, मग बिहारच्या मुख्यमंत्रिपदावर बोलावं”
महाराष्ट्रातसुद्धा जनतेच्या घड्याळ्याच्या ‘टायमिंग’चं काय सांगावं- आशिष शेलार
“बिहारमध्ये नितीश कुमार यांचा घात झाला, भाजप मित्रपक्षांना संपवतो हे पुन्हा सिद्ध झालं”
वारंवार देशात स्वतःचा कचरा केल्याबद्दल शिवसेनेचं परत एकदा अभिनंदन; निलेश राणेंचा टोला